Ad will apear here
Next
महापालिकेतील घोटाळ्यांची पोलखोल करणार - किरीट सोमय्या
मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांवरुन सातत्याने शिवसेनेला कोंडीत पकडणाऱ्या भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी घोटाळ्यांची ‘काळी पत्रिका’ जाहीर करण्याची घोषणा केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तुटल्याचे जाहीर केल्यानंतर आता भाजपने शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
मुंबई महापालिकेतील दहा घोटाळ्यांची काळी पत्रिका जाहीर करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी मुंबईतील विक्रोळीतील सभेमध्ये म्हटले आहे. महापालिकेतील घोटाळ्यांची मालिका थांबत नसल्यामुळे घोटाळ्यांची पोलखोल करणार असल्याचे सोमय्या यांनी सभेत म्हटले आहे. पाणी, नालेसफाई, कचरा, रस्ते या सगळ्या कामांची कंत्राटे देताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. महापालिकेतील दहा घोटाळ्यांचा समावेश ब्लॅक पेपरमध्ये असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. निविदांमधील किमतीच्या तिप्पट रक्कम कंत्राटदारांना देण्यात येत असल्याचा आरोपदेखील सोमय्या यांनी केला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XXELAY
Similar Posts
रिपब्लिकनला २५ जागा; भाजप-मित्रपक्षांतील जागावाटपाचा तिढा सुटला! मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि मित्रपक्ष एकत्र आले आहेत. भाजपने मित्रपक्षांसाठी ३४ जागा सोडल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत जागावाटपावरून भाजप आणि मित्रपक्षांमध्ये निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. भाजप १९५ जागांवर लढणार असून मित्रपक्षांसाठी ३४ जागा सोडण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष
शिवसेना - आम्ही पारदर्शक आहोत पण तुम्ही आहात का? केंद्र सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणात मुंबई महापालिकेतील कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असल्याचे म्हटले होते. यावरुन शिवसेनेने भाजपचा सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे. मुंबई महापालिकेतील पारदर्शी आणि स्वच्छ कारभारावरुन शिवसेनेने भाजपला टोमणा लगावला आहे. पारदर्शी कारभाराचा कोंबडा भाजपने कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी सूर्य उगवला आहे
शिवसेनेची सावध पावलं, महापौरपदासाठी गट स्थापन.. मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा? या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाही. मात्र शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि शिवसेनेला समर्थन दिलेले अपक्ष नगरसेवक आज कोकण भवनावर जाऊन गट स्थापन करणार आहेत. महापौर निवडीच्या दिवशी दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं आहे. शिवसेना आणि भाजप
मुंबईत महिला उमेदवाराचा पैसेवाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल! समाजवादी पक्षाच्या (सपा) महिला उमेदवाराने मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील मतदारांना पैसेवाटप केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आएशा शेख या गोवंडी येथील वॉर्ड क्रमांक १४० मधून सपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांनी मतदारांना पैसेवाटप केल्याचा एक व्हिडिओ काल उजेडात आला. या व्हिडिओत आएशा शेख काही लोकांसोबत मराठीत बोलताना दिसत आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language